सादर करत आहोत संत तुकाराम महाराजांचा अप्रतिम अभंग — शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी. हा विठ्ठल अभंग भक्तीरसाने ओतप्रोत भरलेला आहे.
अभंग लिरिक्स
शुद्धबीजा पोटीं । फळें रसाळ गोमटीं ॥१॥
मुखीं अमृताची वाणी । देह देवाचे कारणीं ॥ध्रु.॥
सर्वांग निर्मळ । चित्त जैसें गंगाजळ ॥२॥
तुका म्हणे जाती । ताप दर्शनें विश्रांती ॥३॥
मुखीं अमृताची वाणी । देह देवाचे कारणीं ॥ध्रु.॥
सर्वांग निर्मळ । चित्त जैसें गंगाजळ ॥२॥
तुका म्हणे जाती । ताप दर्शनें विश्रांती ॥३॥
अर्थ
बीज शुद्ध असेल तर फळही उत्तम येते. ज्याच्या मुखी हरिनामामृत आहे, त्याची वाणी मधुर असते आणि देह सत्कारणी लागतो. तुकाराम महाराज म्हणतात, संतदर्शनाने त्रिविध ताप नष्ट होऊन विश्रांती मिळते.
Song Credit
| Singer | Mahesh Maharaj |
| Music | SB Music Studio |
| Lyricist | Sant Tukaram Maharaj |
| Label | Mohan Media Bhakti |